भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनी सुता, रामदुता प्रभंजना ।। १ ।।
महाबळि प्राणदाता सकळा ऊठवी बळे ।
सौख्यकारी दुःखहारी दुत वैैष्णव गायका ।। २ ।।
दिननाथा हरिरुपा सुंदर जगदंतरा ।
पाताल देवता हंता, भव्य सुंदरलेपना ।। ३ ।।
लोकनाथा जगंनाथा, प्राण दाता पुरातना ।
पुन्यवंता पुन्यशिला पावना परितोषका ।। ४ ।।
ध्वजांगे ऊचळी बाहो, आवेशा लोटला पुढे ।
काळाग्नी काळरुद्राग्नी देखताकापती भये ।। ५ ।।
ब्रम्हांडि पायीलीनेनो, आवाळे दंत पंगति ।
नेत्राग्नि चालील्या ज्वाळा, भ्रुकुटि ताठिल्या बळे ।। ६ ।।
पुच्छ ते मुरुडिले माथा, किरीटि कुंडलेबरी ।
सुवर्नाकटीकासोटी घंटा किंकीनि नागरा ।। ७ ।।
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळु ।
चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी ।। ८ ।।
कोटि च्या कोटि ऊड्डाने झेपावे ऊत्तरेकडे ।
मद्रादरि सारखा द्रोनु क्रोधे ऊत्पाटिला बळे ।। ९ ।।
आनिला मागुति नेला,आला गेला मनोगती ।
मनासी टाकिले मागे, गतिसी तुलना नसे ।। १० ।।
अनुपासुनी ब्रम्हांडा ऐवढा होत जातसे ।
तयासी तुलना कैसे मेरुमंदार धाकुटे ।। ११ ।।
ब्रह्माण्डा भोवते वेढे वज्र पुच्छे करु शके ।
तयासि तुलना कैैसि ब्रम्हांडि पाहता नसे ।। १२ ।।
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सुर्यमंडळा ।
वाढता वाढता वाढे, भेदिले शुन्य मंडळा ।। १३ ।।
धन, धान्य, पशुवृद्धी, पुत्र, पौत्र समग्रहि ।
पावती रुप विद्यादी, स्तोत्र पाठे करुनिया ।। १४ ।।
भुतप्रेत समदांधी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने ।। १५ ।।
हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ।
द्रुढ देवो निसंदेहो, संख्या चंद्रकुळागने ।। १६ ।।
रामदासी अग्रगन्यु कपिकुळासी मंडनु ।
रामरुपी अंतरात्मा दर्शने दोश नासति ।। १७ ।।
ईति श्री रामदास कृतं संकटनिरसनम ।
श्री मारुति स्तोत्र संपुर्नम ।।