श्री सतचित्तानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय !
ओवाळू आरती
ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा । माझ्या साईनाथा ।
पाचाही तत्वांचा दीप लाविला आता || धृ ||
निर्गुणाची स्थिती कैशी आकारा आली । बाबा आकारा आली ।
सर्वा घटी भरुनी ऊरली साई माऊली || ओवाळू आरती || १ ||
रज तम सत्व तिघे माया प्रसवली । बाबा माया प्रसवली ।
मायेचीये पोटी कैसी माया उद्भवली || ओवाळू आरती || २ ||
सप्तसागरीं कैसा खेळ मांडीला । बाबा खेळ मांडीला ।
खेळुनिया खेळ अवघा विस्तार केला || ओवाळू आरती || ३ ||
ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोळा । बाबा दाखविली डोळा ।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा || ओवाळू आरती || ४ ||
आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत | मनु वेधला माझा || धृ ||
लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || आरती ज्ञानराजा || १ ||
कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो | साम गायन करी || आरती ज्ञानराजा || २ ||
प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले || आरती ज्ञानराजा || ३ ||
आरती तुकारामा
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||
राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले || आरती तुकारामा || १ ||
तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||
जय जय साईनाथ हो
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो | जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो
आळवितो सप्रेमे तुजला, आरती घेऊनि करी हो | जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो || धृ ||
रंजवीसी तु मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो । रंजवीसी तु मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो ।
भोगिसी व्याधी तूच हरुनिया निजसेवक दुःखाला हो । भोगिसी व्याधी तूच हरुनिया निजसेवक दुःखाला हो ।
धावुनी भक्त व्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो । धावुनी भक्त व्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो ।
झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो || जय जय साईनाथ || १ ||
शमा शयन सुंदर हि शोभा, सुमन शेज त्यावरी हो । शमा शयन सुंदर हि शोभा, सुमन शेज त्यावरी हो ।
घ्यावी थोडी भक्तजनांची पूजन अर्चा करी हो । घ्यावी थोडी भक्तजनांची पूजन अर्चा करी हो ।
ओवाळितो पंच प्राण ज्योती सुमती करी हो । ओवाळितो पंच प्राण ज्योती सुमती करी हो ।
सेवा किंकर भक्त प्रीती, अत्तर परिमळ वारी हो || जय जय साईनाथ || २ ||
सोडूनि जाया दुःख वाटते बाबांच्या चरणास हो । सोडूनि जाया दुःख वाटते साईंच्या चरणास हो ।
आज्ञेसह हा आषीर्प्रसाद, घेऊनि निजसदनासी हो । आज्ञेसह हा आषीर्प्रसाद, घेऊनि निजसदनासी हो ।
जातो आता येऊ पुनरुपी, तंव चरणांचे पाशी हो । जातो आता येऊ पुनरुपी, तंव चरणांचे पाशी हो ।
उठवू तुजला साईमाऊली, निजहित साधायास हो || जय जय साईनाथ || ३ ||
आता स्वामी
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, बाबा करा साईनाथा । चिन्मय हे सुखधाम जाऊनि पहुडा एकांता || धृ ||
वैऱ्यागाचा कुंचा घेहूनि चौक झाडीला , बाबा चौक झाडीला । तयावरे सुखप्रेमाचा शिडकावा दीधला || आता स्वामी || १ ||
पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती, बाबा नवविधा भक्ती । ज्ञानाच्या समया लावूनी उजळल्या ज्योती || आता स्वामी || २ ||
भावार्थाचा मंचक हृदया काशी टांगीला, हृदया काशी टांगीला । मनाची सुमने करोनि केले शेजेला || आता स्वामी || ३ ||
द्वैताचे कपाट लावूनी एकत्र केले, बाबा एकत्र केले । दुर्बुद्धीच्या गाठी सोडूनि पडदे सोडिले || आता स्वामी || ४ ||
आशा तृष्णा कल्पनेचा सोडूनि गलबला , बाबा सोडूनि गलबला । दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला|| आता स्वामी || ५ ||
अलक्ष्य उन्मने घेऊनि नाजूक दृशेला, बाबा नाजूक दृशेला । निरंजन सदगुरु स्वामी निजविले शेजेला || आता स्वामी || ६ ||
श्री सतचित्तानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय !
श्री गुरुदेव दत्त !
पाहीन प्रसादाची वाट
पाहे प्रसादाची वाट घ्यावे धुवोनिया ताट | शेष घेवोनि जाईन तुमचे झालीया भोजन ||
झालो एकसवा तुम्हा आडुनिया देवा | शेष घेवोनि जाईन तुमचे झालीया भोजन ||
तुका म्हणे चित्त करूनि राहिलो निवांत | शेष घेवोनि जाईन तुमचे झालीया भोजन ||
आता स्वामी
पावला प्रसाद आता विठू निजावे, बाबा आता निजावे । आपुला तो श्रम करो येतसे भावे ।
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, बाबा साई दयाळा । पुरले मनोरथ जातो आपुले स्थळा ||
तुम्हांसी जागवू आम्ही आपुल्या चाडा, बाबा आपुल्या चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हरवया पीडा ।
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, बाबा साई दयाळा । पुरले मनोरथ जातो आपुले स्थळा ||
तुका म्हणे दिधले उद्दिष्टांचे भोजन, उद्दिष्टांचे भोजन । नाही निवडिलें आम्हां आपुल्या भिन्न ।
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, बाबा साई दयाळा । पुरले मनोरथ जातो आपुले स्थळा ||
सदगुरु साईनाथ की जय !
ओम राजाधिराज योगीराज परमब्रहम साईनाथ महाराज !
श्री सतचित्तानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय !